नविन महाविद्यालय सुरु करण्यासाठी करावयाचा अर्ज :


शिक्षण (B.Ed), शारीरिक शिक्षण (B.Ed), वैद्यकीय शाखेचे महाविद्यालय सोडून (महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 कलम 109 अन्वये )
(महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 कलम 109 अन्वये ) महत्वाच्या सुचना :
१.
ज्या संस्थेला व्यावसायीक अभ्यासक्रमाचे नविन महाविद्यालय सुरु करावयाचे आहे. त्या संस्थेने ह्रा अर्जाच्या सहा प्रती आवश्यक शुल्कासह ज्या वर्षात महाविद्यालय सुरु करावयाचे आहे, त्यापुर्वीच्या वर्षात 30 सप्टेंबर पुर्वी कुलसचिव, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांना सादर कराव्यात.
२.
ज्या संस्थेला कला, वाणिज्य, विज्ञान व समाजविज्ञान या विद्याशाखेतील नविन महाविद्यालय सुरु करावयाचे आहे. त्या संस्थेने ह्रा अर्जाच्या सहा प्रती आवश्यक शुल्कासह ज्या वर्षात महाविद्यालय सुरु करावयाचे आहे, त्यापुर्वीच्या वर्षात 30 सप्टेंबर पुर्वी कुलसचिव,संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांना सादर कराव्यात
३.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत जे विषय/अभ्यासक्रम मान्यताप्राप्त आहेत. त्याच विषयांच्या/अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना शासनाने मान्यता दिलेल्या वर्षी विद्वत परिषदेच्या मान्यतेनंतर नविन महाविद्यालय सुरु करण्यास संलग्निकरण प्रदान करण्याबाबत विचार करण्यात येईल. अन्यथा नविन विषयांच्या / अभ्यासक्रमाच्या संबंधीत अभ्यासक्रमिका/परीक्षेची योजना तयार करण्यास लागणारा विलंब लक्षात घेता अशा अभ्यासक्रमांची महाविद्यालये अथवा त्यामधील विषय सुरु करण्यास विद्वत परिषदेच्या निर्णयानंतर त्यापुढील वर्षी संलग्निकरण प्रदान करण्याबाबत विचार करण्यात येईल.
४.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 कलम 109 नुसार शासनाने नविन महाविद्यालयास मान्यता देण्याची अंतिम तिथी आता 15 जून निर्धारित केलेली आहे. त्या तारखेनंतर शासनाकडुन परवानगी मिळालेल्या नविन महाविद्यालयास पुढच्या शैक्षणीक सत्रापासुन प्रथम संलग्निकरण देण्याची कार्यवाही करण्यात येईल.
५.
शासनाकडुन नविन महाविद्यालय सुरु करण्यास परवानगी प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 कलम 110 मध्ये नमुद केल्ेल्या तरतुदीनुसार प्रथम संलग्निकरण प्रदान करण्याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल.
६.
समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रिडा विभाग, महाराष्ट्र शासन यांचा शासन निर्णय क्रमांक : शाशीस-1995/प्र.क्र.93/क्रीयुसे-3, दिनांक 10 ऑक्टोंबर 95 अन्वये 1995-96 या शैक्षणिक सत्रापासुन कोणत्याही संस्थेस नविन शारीरिक शिक्षण महाविद्यालय सुरु करण्याकरीता परवानगी न देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. .
७.
शासन पत्र क्र. एनजीसी-2004/(523/04)/मशी-3, दिनांक 4 फेब्राुवारी, 2005 नुसार विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने, “सन 2006-2007 या शैक्षणिक वर्षासाठी 2005-2006 या वर्षात नव्याने बी.एड. महाविद्यालये सुरु करण्यासाठी अर्ज स्विकारण्यात येऊ नयेत” असा निर्णय घेतला आहे. त्या त्यानुषंगाने शासनाचे पुढील आदेश प्राप्त झाल्या शिवाय बी.एड. महाविद्यालयांचे प्रस्ताव स्विकारण्यात येणार नाही. याची कृपया नोंद घ्यावी.
८.
शासनाने व विद्यापीठाच्या प्राधिकारिणीने वेळोवेळीघेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे संस्थेला बंधनकारक राहिल.
९.
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयासंबंधीची माहिती.
अ)
ज्या तालुक्यात नवीन महाविद्यालयास परवानगी घ्यावयाची आहे. तेथील महाविद्यालयाची संख्या व त्या महाविद्यालयातील प्रथम वर्ष कला वाणिज्य व विज्ञान शाखा निहाय विधार्थी संख्या याबाबत स्वतंत्र माहिती घ्यावी.
ब)
महाविद्यालयाने कला वाणिज्य व विज्ञान विद्याशाखेतील मागितलेल्या विषयाची प्रस्तावासोबत असावी. हे विषय जवळच्या कोणत्या महाविद्यालयात (पायी अंतराने जाणे) शिकविले जातात, याबाबत स्वत्रंत माहिती घ्यावी.
क)
महिलांसाठी महाविद्यालयाचा प्रस्ताव सादर करावयाचा असल्यास त्या जिल्यातील/तालुक्यातील अस्तित्वात असलेल्या महिला महाविद्यालयाची स्वत्रंत माहिती घ्यावी.
१0.
व्यावसायिक महाविद्यालयासबंबांधितची माहितीच्या संदर्भात शासनाचे असे आदेश आहेत. कि, कला वाणिज्य व विज्ञान या खेरीज इतर विद्याशाखाची महाविद्यालये उघडण्याबाबतचे प्रस्ताव स्वतंत्रपणे पाठविण्यात यावे. याबाबत पुढील सूचना लक्षात ठेवण्यात यावेत. इंजिनीरिंग,अर्सिटेक्टर इत्यादी यांत्रिक महाविद्यालये ज्या संस्थांना उडव्याची आहेत. त्या संस्थांनी प्रथम प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून तो संचालक तंत्रशिक्षण यांचे मार्फत ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेकनॉलॉजि एडुकेशन वेस्टर्न रेजिनल कमिटी,मुंबई यांचेकडे पाठवावा.
११ .
नवीन महाविद्यालयाचे आवेदन शुल्क निदेश क्रमांक ३९/२००४ मधील तरतुदीनुसार परत मिळणार नाही.
१२.
१३.नवीन महाविद्यालयाचे आवेदन शुल्क व प्रथम संलग्नीकरण शुल्क हे निदेश क्रमांक ३९/२००४ मध्ये दर्शविल्यानुसार विद्याशाखानिहाय राहील.
१३ .
अर्जाची झेरॉक्सप्रत स्वीकारलेल्या जाणार नाही.
१४.
आवेदनपत्र व या सोबत जोडलेले परिशिष्ट ‘अ’ अचूक भरण्यात यावे, शासन निर्मयानुसार परीशिष्ट ‘ब’ मध्ये नमुद केल्याप्रमाणे तपासणी सुचीनुसार संपुर्ण दस्तावेज अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे. तसेच त्यामध्ये पृष्ठ क्रमांक स्पष्टपणे नमुद करावे, अन्यथा आवेदनपत्र विद्यापीठ स्तरावरच रद्द करण्यात येईल.
१५
I) नवीन महाविद्यालय सुरु करण्याबाबतचे पोस्टाने पाठविलेले आवेदन स्वीकारल्या जाणार नाही.
II) नविन महाविद्यालय सुरु करण्याबाबतचा अर्ज संस्थेने विद्यापीठात सादर करतांना सदरहु आवेदनपत्रामध्ये नमुद असलेले नविन महाविद्यालये सुरु करण्याबाबतचे शुल्क स्विकारण्याबाबत विद्यापीठाच्या महाविद्यालयीन विभागाने वित्त विभागाला लेखी शिफारस केल्याशिवाय वित्त विभागात शुल्क स्विकारल्या जाणार नाहीत
१६.
संस्थाधारकांनी नविन महाविद्यालयाचे अर्ज ONLINE पध्दतीने www.sgbau.ac.in यासंकेत स्थळावर भरावे तसेच संबंधीत अर्ज ईलेक्ट्रॉनिक पध्दतीने म्हणजेच VCD आणि प्रचलीत पध्दतीने Hardcopy मध्ये 6 प्रतित विद्यापीठाकडे सादर करावेत. संस्थेमध्ये असलेल्या सोयी-सुविधा व कर्मचारी / शिक्षक यांच्या विषयीचे Video चित्रिकरण करावे व सदर प्रस्ताव DVB-TTSurekh फॉन्टमध्येच सादर करणे आवश्यक आहे, अन्यथा आवेदनपत्र विद्यापीठ स्तरावरच रद्द करण्यात येतील.
१७.
विद्यापीठाच्या बृहत आराखड्यामध्ये दर्शविलेल्या ठिकाणासाठीच अर्ज स्वीकारल्या जाईल.